बुधवार, ४ मे, २०११

श्रीमती लीलावती दत्तात्रय आपटे




श्रीमती लीलावती बाळासाहेब आपटे. श्रीमती लीलावतीचा जन्म ऊज्जॆन मध्य प्रदेश च्या ऊच्चभ्रू परिवार माधव कालेजचे प्रोफेसर शंकर रामचंद्र वॆद्य यांचेकडे १०मार्च१९२४ला झाला. लहानपणी पासून ९वर्ष वया पर्यंत वॆद्य घराण्यात एकुलती,रूपवती शिवाय देखणी असल्याने १९३९ला १६व्या वर्षी दत्तात्रय हरी ऊर्फ बाळा साहेबांशी विवाह होऊन ग्वाल्हेरला आपटे वाडा चिटणीस गोठात आल्या.घरांत मोठे म्हणून फक्त कुंटे मावशीच होत्या देवाच्या कृपेने त्यांनाअपत्ये झाली १ला४,,नंबर मुलगे अल्पायुशी २कलावती ३सुधाकर ६सुभाष प्रकाश जिवंत हयातीत आहेत..आपल्या चॊकी वाड्यात ऎशो आरामात १९४ पर्यंत, १९४० मुलगा, १९४२ कलावती, १९४४ सुधाकर, १९४५ मधुकर ही चॊघे वाड्यात जन्माला आली. पुढे राजाला रोज कागाळ्या करून बाळाला वाड्यातून हुसकावून लावले पण वाडा सोड्ण्यापूर्वी १ला मुलगा जग सोडूनगेला बाळाचा पोषभत्ताही बंद झाल्यामुळे नोकरी करणे भाग पडले.खर्‍या अर्थाने लीलाबाईंचा १९४५ च्या मधूच्या (अल्पायुषी) ज्न्म मृत्यूनंतर वाडा सोडला १४ वर्षांचा वनवास सुरू झाला. छ्त्री बाजारात एका भाड्याच्या घरात असताना बाळा साहेबांना स्टेट्ची ट्रेझरी आफीसरची नोकरी मिळाली वर्षात १५ अगस्त १९४७ ला भारताच्या स्चातंत्र्या नंतर राज्ये सगळी संपवली गेली आणि "मध्यभारत"" एकप्रदेश ऊगवला म्हणून बाळासाहेबांची सरकारी नोकरी सुरू होऊन मंदसोरला ट्रेझरी आफीसर म्हणून बदली झाली. तेथे जेमतेम १वर्ष नंतर अरूण(मुलगा)च्या जन्मानंतर १९४९ मधे बाळा साहेबांना एकाऊंटंट जनरल आफीसात आफीसर म्हणून बढती १९५१ ईंदोर येथे बदली झाली.पुढे. वर्षानंतर मध्यप्रदेश बनला म्हणून १९५२ ला केन्द्र सरकारशी संलग्न होऊन पुढे .जी.शी भांडण झाले त्यांची बदली राजकोट (गुज) येथे केली गेली.तेथे केन्द्रीय मंत्र्याशी मॆत्री करून पुन्हां १९५५ ला बदली होऊन ग्वाल्हेरला .जी आफीसात आले ग्वाल्हेर्ला साठे याव्या घरांत लोहिया बाजारात भाड्याने २वर्ष राहिलो.आश्र्चर्याची गोष्ट राजे जीवाजीरावांना बाळाच्या मॆत्रीची आठवण झाली जुन्या आठवणीं वरून बाळावर केलेल्या अन्यायाची दुरूस्तीसाठी अण्णा साहेबांना बाळाला हिस्सा देण्यासाठी दबाव आणला म्हणून त्या वाड्याचा षष्ठांशभाग दान बाळाला दिला अश्या पध्दतीने लीलाबाईंचा माहे २६ मॆ १९५८ ला एकीकडे वनवास संपल्याचा आभास दुसरीकडे ग्रहदोषाची सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली.आपल्या घरी बाहेर आंगणातझोपलेल्या अवस्थेत जूनमधे उजव्या पायाच्या पोटरीला विषारी कीडा चावला रात्री २ला उठून बघितले तर एक ईंच खोल अर्धा ईंच गोल घाव दिसला पण किड्याचे दर्शन झाले नांही.एक मुखाने जुन्या सगळ्या वडील मंडळीं च्या तोंडून निघाले की अण्णा साहेबांनी"मूठ मारली".पुढे तो घाव तर बरा होणे सोडून १८ जुलॆ १९५८ ला ग्वाल्हेरच्या जय आरोग्य होस्पीटल मधे भरती केले आणि २५ जूलॆ १९५८ ला शव बाहेर काढले.असे लीलाबाईंना वॆधव्य आले पण त्यास्थितही त्यांनी कठोर मनाचा परिचय दिलाच पण बुध्दीचा समतोल राखून एका १९३९ ला मॆट्रिक फेल बाईने २० वर्षांनंतर १९५८ च्या वॆधव्या नंतर १९५९ च्या मॆट्रिक परीक्षा पहिल्या धडाक्यात पास करून २५ डिसेंबर १९५९ पासून चार ह्जार पुरूषां मधली एकमेव पहिली .जी. आफीसची महिला कर्मचारी होण्याचा बहुमान मिळवला. .
पुढ्चा प्रवास एकीकडे आफीसची जवाबदारी दुसरीकडे चार अपत्यांना चांगले संस्कार देण्यापासून ते सुशिक्षित होऊन मोठे काळजी ह्याशिवाय बाईंची पदवीधर होण्याची महत्वाकांक्षा ही तारेवरची कसरत त्यांनी ईतक्या शांतपणे पूर्ण केले की मुलगी सुग्रही लग्न होऊन आठवले परीवारात सुखी,मोठा मुलगा हा ईले. ईंजीनिअर तिसरा सुभाष बी.एस सी चॊथा प्रकाश एम.असे पूर्णतर केलेच शिवाय आपला कविता करण्याचा छंद ४०० ज्या पुढे तीन पुस्त्कातून छापल्या आणि बाळासाहेबांनी पेशव्यां-चे
नोव्हेंबर१९७३ला
नोकरी
दिवसा
मुलीकडून नातू म्हणून केन्द्र सरकारला अर्जाचा पाठपुरावा करून सन ताहयात पेंशन मिळवली. १९८४ पर्यंत स्वाभिमानाने करून .जी आफीसातून निवृत्ती झाली. अश्या पध्दतीने शेवटच्या पर्यंत बाईंनी तीन पेंन्शनी मिळवल्या व१९सेप्टेंबर२००९ला देवाज्ञा नवरात्रीच्या  पहिल्या दिवशी सुदिनी झाली.  ईंदोरला असताना जून१९४९ला सुभाष १९५०ला प्रकाशचा जन्म.

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

ष्री. दत्तात्रय हरि ऊर्फ बाळासाहेब आपटे


संस्थान दत्तात्रय हरी ऊर्फ बाळासाहेब आपटॆ
द्त्तात्रय हरीचा जन्म१५अगस्त१९१५रोजी चिटणिस गोठातल्या राहत्या वाड्यात झाला.२वर्षात आजी बयाबाई,५वर्ष वयात आई सरस्वती बाई आणि ९वर्ष वयात हरी ऊर्फ नाना साहेब सगळी वडीलधारी मंडळी निधन पावल्यामुळे त्यांना मोठे करण्याची जबाबदारी त्यांची कुंटे विधवा मावशीने पार पाड्ली.
त्याकाळी माधवराव शिंदे यांच्या निधना नंतर राज्याची धुरा राणी अम्मा महाराजांच्या हातात येताच बाळा साहेबांना सरदार स्कूलचे नवीन
नांव सिंधिया स्कूल मधे शिकण्यासाठी ग्वालियर किल्यावर राहण्यासकट व्यवस्था झाली. ईंग्रजांचा जीवाजीरावला बाहेर गावी शिकायला धाडण्याचा
जेव्हां आग्रह सुरू झाला तेव्हां अम्मा महाराजांच्या लक्षात आले की राजाला बाहेर नेऊन बाईबाट्लीच्या नादाला लावण्याचे कारस्थान आहे तेव्हां इंग्रजांना सांगितले की एकट्याला म्हणून नांही पण ५ साथी व ३जाती १ बाळ आपटे २ बाळ जोशी ३ राजे जीवाजीराव ४काकडे ५ महेन्द्रसिंह(१व२ब्राम्हण,३व४मराठे,५पहाडी) हे पांचजण लायलपुरला (जे १९४७च्या फाळ्णीमुळे आता पाकिस्तानात)शिकावयास धाडले गेले.
माझे वडील बाळ हे अम्मा महाराज व राजे जीवाजीरावांच्या खास गोटातले म्हणून राणीने बाळाला वेगळे बोलावुन सांगितले,"बाळ हे
चुलत बंधू तुझे काळ आहेत तेव्हां त्यांना मी देश निकाला देत आहे."तेव्हां सरदार माधव श्रीधर ऊर्फ अण्णा साहेबांनी जयेन्द्र्गंजाच्या पुलावर बाळाच्या बग्गीला रोकून पाय पकडून देश निकाला होऊ न देण्यासाठी अभय वचन घेतल्यावर बग्गीच्या घोड्याची रास सोडली व नंतरच बाळ
महालात जाऊ शकले आणि तीच बाळाच्या आयुष्याच्या ऊताराची खरी सुरूवात झाली.
पहिली हार- जहागिरदारी श्रीधरपंत ज्यांचे दत्तविधानास दोन मुले बायको सह राजाच्या मंजुरी संबंधित श्रीयुत नाना साहेबांनी केलेली ऊजरदारी नामंजूर होऊन नानासाहेबांचे अकाली निधन.दुसरी हार-जेव्हां बाळ मर्जीतला असताना राणीने विषेश आदेश लायपुरला जाण्यापूर्वी दिला,"बाळ राजा तुझ्या सही शिवाय गंगाजळीतून एक रूपया काढ्णार नांही व तो कोठे जातो व काय करतो ह्याचा रोजनामचा(डायरी) मला तुझ्याकडून हवी आहे.बाळा साहेबाची "दोन्ही (खालचे व वरचे) दातात जीभ अशी परिस्थिती निर्माण केली की पुढे आयुष्यभ्रराला आठवण अशी,तिसरी आणि शेवट्ची हार-६ नोव्हेंबर१९३६ जार्ज जीवाजीरावांना राज्याभिषेक आणि १० नोव्हेंबर १९३६ला दारूच्या नशेत बाळ आपटेला लायलपुरचे हे ईनाम,"राहता वाडा व कंपूतला बाग सरदार माधव श्रीध्ररच्या नावे केला.
पुढे बाळासाहेबांनी केलेल्या ऊजरदारीत व्यवस्थित वर्णन केले की माधव ऊर्फ अण्णासाहेब श्रीधरच्या दत्तविधाना पुर्वी मूळ्च्या देवासचे जन्मलेले त्यांचा आमच्या घराण्याशी किव्हां जहागिरदारीशी कांहीही
संबंध नांही तरीही ह्या मुद्देसूद गोष्टीकडे सोईस्कर रीत्या दुर्लक्ष करून जहागिरदारी अण्णा साहेबांच्या नावे करून ऊरली सुरली वाट लावून पेशव्यांच्या वंश्जांना देशोधडीला लावले.

१९४५ला
टांगेवाला
सरदार अण्णासाहेबांनी बाळाचे पाय धरून देशनिकाला पासून अभय वचन घेऊन वेळ आल्यावर  पाय ओढून चारो खाने चित केले.सन मधुकरच्या जन्मानंतर राजाला ऊलट सुलट कान भरणे, कागाळ्या करणे हलकट्पणाचा कळस म्हणजे शेजारी,न्हावी, शेवटी यांच्या हाती बाळाने वाडा सोडण्यासाठी निरोप धाडून अपमान करणे सोडले नांही म्हणून रागानी बाळाने वाडा सोडून १३ वर्षाचा असा वनवास ऒढ्वून घेतला.
स्वकीयाने
झोपलेल्या
वाडा सोडल्यावर आणि अण्णासाहेबांनी पोषभत्ता रक्कम बंद केल्यामुळे बाळा साहेबांना ग्वाल्हेर राज्याची नोकरी करणे भाग पडले.छत्री बाजारांत भाड्याच्य़ा घरात राहात असताना त्यांना ट्रेझरी आफीसर म्हणून नोकरी मिळाली.पुढे १५अगस्त १९४७ ला सगळी राज्ये खालसा झाल्याने, "मध्यभारत" राज्याची स्थापना झाली बाळाची बदली मंदसोरला ट्रेझरी आफीसर म्हणून बदली झाली. जेमतेम १वर्षानंतर१९४८ला अरूणचा जन्म झाला. पुढे बाळासाहेबांवी बढती होऊन एकाऊंट्ण्ट जनरल मधे आफीसर झाले १९५०ला ईंदोरला बदली झाली.पुढे १९५१ला मध्य-प्रदेश राज्याची स्थापना होऊन नोकरी केन्द्र्शासित झाली.कांही कारणा  वरून १९५२ला .जी.शी मतांतरामुळे राजकोट(गुजरात) येथे बदली झाली. पुढे बाळासाहेबांनी केन्द्रीय मंत्र्याशी मॆत्री साधून १९५५ला परत ग्वाल्हेरला बदली करवून घेतली लोहिया बाजारात साठ्यांच्या घरात भाड्याने २वर्ष काढ्ली त्यात आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे राजे जीवाजीरावांना १९२४ते १९३६ चा सहवास व कोणी बाळाच्या मॆत्रीची आठवण केली त्यांनी अण्णा साहेबांवर बाळाला त्याचा हिस्सा देण्यासाठी दबाव आणला.परीणामी वाड्याचा षष्ठांश भाग २२मई१९५८ला दान दिला. एकीकडे वनवास संपण्याचा आनंद तर दुसरीकडे नवीन ग्रहद्शा सुरू होण्याची चाहुल लागून एका रात्री आंगणात अवस्थेत २वाजता उजव्या पायाच्या पोटरीला विषारी कीडा चावला, उठून बघितले तर अर्धा ईंच गोल एक ईंच खोल खड्डा पण कीडा कांही दिसला नांही.तश्याच अवस्थेत १६जुलॆ१९५८ पर्यंत आफीसात गेले. पुढे," जलोदर" ह्या पोटाच्या आजाराच्या कारणाने १८जुलॆला जय आरोग्य मोठ्या दवाखान्यात भरती केले २५ जुलॆ १९५८ला मरणो-परांत प्रेत दवाखान्यातून बाहेर काढले.