सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

सरदार गणेश हरि ऊर्फ रावसाहेब आपटे

                                            सरदार गणेश हरि ऊर्फ रावसाहेब आपटे
                                   (पत्नी -  बयाबाईसाहेब, पुत्री बाजीराव पेशवा द्वितीय)
सरदार गणेश हरी ऊर्फ राव साहेब आपटे सरदार गणेश हरी हे वडील आजोबा सारखे अश्वविद्येत तर पारंगत होतेच शिवाय गजविद्येतही पारंगत होते. जसे राव साहेब मोठे लग्नवयात आले तसे जयाजीरावांच्या आई बायजाबाईंचे लक्ष, विठुरवासी बाजीराव (द्वितीय) यांची मधली मुलगी, सरस्वतीबाई ऊर्फ बयाबाई साहेबांवर गेले त्यांनी मध्यस्थी होऊन राव साहेबांशी लग्न १९४९ मध्ये विठुरला घडवून आणले संपूर्ण एक महिना लग्न-
सोहळा
विठुरवासियांना निमंत्रण चुलीला अक्षद होती."सारंगा" हा अस्सल अरबी घोडा त्यांचा आवडता होता. एकदा ग्वाल्हेर येथे मिरवणूक निघाली असता वाटेत अकरा हात ऊंचीची एक मा लागली अनेक स्वारांनी त्या कमानी ला हात लावण्याचा प्रयत्न केला. जयाजीराव महाराज अंबारीत होते आणि हत्तीच्या साथीला घोड्यावर एका बाजूला हरीपंत दुसर्‍या बाजूला गणेशपंत होते.ईतरांचे कमानीला हात लावण्याचे फसलेले प्रयत्न गणेशपंतांची घोड्यावरची चुळ्बुळ बघून महाराजांनी गणेशपंतांना घोडा फेकण्या करीता आज्ञा केली.त्याबरोबर गणेशपंतांनी सारंगाला टाच मारून कमानी वर मधोमध घोडा झेपावला हात लावला. ते बघून जमलेल्या शेकडो लोकांच्या तोंडून कॊतुकाचे शब्द बाहेर पडले.         गणेशपंत अतिशय तापट होते.एकदा कांही क्षुल्लक बाबीतून एका यूरोपियनशी भांड्ण झाले,त्या अधिकार्‍याच्या तोंडावर थुंक्ल्याने तक्रारी वरून जयाजीराव महाराजांनी गणेशपंताना आग्रा राहण्यास धाडले पुढे कांही दिवसांनी तेथे स्पर्धा झाल्या.स्पर्धांबद्दल राजांनी केल्यावर गणेशपंत बोलले""महाराज लोक घोड्यावर बसून घोड्याच्या ईज्जतीशी खेळ करताहेत त्यामुळे घोडे म्हॆस बॆला सारखे ऊड्या मारतात आहेत.""महाराजांची आज्ञा झाल्यावर,गणेशपंतानी स्वारांना घोड्यांनी ऊडी घेण्यासाठी बनविलेल्या चॊथर्‍यावर एका स्वारांस भाला देऊन ऊभे केले त्यावरून ऊडी मारणे यूरोपियनने अशक्य असण्याचे म्हणतांच त्यावरून गणेर्शपंतानी सारंगावर स्वारी करून भाल्यावरून झेप घेऊन पलीकडे गेले पुन्हा पलटून झेप घेऊन आपल्या जागी परत आले.अश्या पद्धतीने यूरोपियन अधिकार्‍याच्या सांगण्य़ावरून महाराजांनी गणेशपंतांना ग्वाल्हेरला परत बोलावले.पुढे १९८३ मधे बाबा साहेबांच्या पाठोपाठ १९८४ मधे निपुत्रिक असताना राव साहेबांना पण देवाज्ञा झाली
                     ----<<

ंंं>>>----.

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

इतिहासाचे संक्षिप्त पूर्वआवलोकन

                                     ---:ईतिहासाचे संक्षिप्त पूर्वावलोकन:---
         श्रीवर्धन(कोंकण) येथील भट घराण्यातील ई.सन १६६० मध्ये जन्मलेल्या बाळाजी विश्वनाथ याने स्वकर्तुत्वाने व अक्कल हुशारीने १६९९ मध्ये पुण्याची सुभेदारी, सन १७०३ मधे  त्यांस दॊलताबाद्ची सरसुभेदारी बहाल केली गेली. ३.३.१७११ ला चॊथाई वसूलीची सनद मिळवून २०.८.१७११ ला ते कोल्हापूरच्या  शाहू महाराजांचे सेनापती झाले, आणि पुढे १७.११.१७१३ ला त्यांना पेशवेपद शाहूमहाराजांनी  बहाल केले. दरम्यान १८.८.१७००   ला बाजीराव(प्रथम) आणि सन  १७०६ ला चिमाजी अप्पांचा जन्म झाला. बादशहा कडून १७.०३.१७१९ ला सरदेशमुख पदाची    सनद मिळाल्यावर सन २.४.१७२०  ला बाळाजी विश्वनाथ यांना देवाज्ञा  झाली. बाळाजी विश्वनाथांच्या निधनानंतर १७.४.१७२१ ला बाजीराव(प्रथम) पेशवेपदी आले. २५.३.१७२१ ला सासवडहून पुण्यास स्थलांतर केल्यावर २१.६.१७२६ ला छ्त्रपतींनी पुणे गांव पेशव्यांस इनाम दिले. पुढे बाजीरावांनी पुण्यात १७३० ते १७३२ शनिवारवाडा बांधला. जस-जशी पेशव्यांची राज्य व्यवस्था वाढ्ल्यामुळे, कारभार सांभाळणे कठिण होत होते, तसे १७३१ला मल्हारराव होळकरांना इंदोरचे आणि १७३२ला राणोजी शिंदे यांना ग्वाल्हेरचे, सुभेदार  नेमले आणि पुढे त्यांची वेगळी राज्ये स्थापन करून त्यांना राजे बनविले. १.८.१७३४ ला रघुनाथ उर्फ राघोबांचा जन्म झाला व पुढे १७.१२.१७५५ ला आनंदीबाईशी विवाह झाला. १३.१२.१७७२ रोजी नारायणराव पेशवेपदी आले आणि ३०.८.१७७३ला शनिवार वाड्यात बाराभाई कारस्थानामुळे त्यांची हत्या झाली. १०.१०.१७७३ ला राघोबा पेशवा झाले, पण त्यांचे पेशवेपद शाहू महाराजांनी २८.३.१७७४ला रद्द करून १८.४.१७७४ला जन्म झालेल्या बाळाला २५.४.१७७४ला सवाई माधवरावांना पेशवेपद बहाल केले १०.१.१७७५ला धार येथे बाजीराव(द्वितीय) यांचा जन्मझाला. २०.७.१७८३ला राघोबा व आनंदी बाई यांना नजरकॆद झाली व १३.१२.१७८३ला राघोबादादांचे निधन झाले. २५.१०.१७९५ ला सवाई माधवरावाला देवाज्ञा झाली. सवाई माधवराव १२ वर्ष निपुत्रिक राहिल्याने म्रुत्यूनंतर ४.१२.१७९६ला बाजीराव(द्वितीय) पेशवा झाले. २४.१०.१८०२ला बाजीराव पदभ्रष्ट होताच २५.१०.१८०२ला यशवंतराव होळ्करांनी पुणे उध्वस्त केले. ३१.१२.१८०२ला बाजीरावांनी इंग्रजांशी तॆनाती फॊजेचा तह केला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या सहाय्याने पेशवा १३.५.१८०३ला झाले. १६.११.१८१७ला बाजीरावांनी पुणे कायमचे सोडले आणि उत्तर प्रदेशच्या कानपुर जवळ विठूरला त्यांच्या फॊजेसह स्थलांतर केले. फॊजेचे सरसेनापती नारो विष्णू आपटे हे त्यांच्या संरक्षणासाठी स्थलांतरित झाले. १७.११.१८१७ला इंग्रजांनी शनिवार वाड्यावर निशाण फड्कवले. पुढे ३.६.१८१८ला इंग्रजांनी बाजीरावांना असीरगढच्या किल्ल्यात बंदिस्त करून रसदीच्या अभावी जेरीस आणले आणि वार्षिक पेन्शनच्या मोबदल्यावर संधी करणे भाग पाडले. अशा पध्दतीने बाजीराव(द्वितीय) इंग्रजांचे प्रतिनिधी माल्कमचे स्वाधीन झाले व पेशवाई संपुष्टात आली. कालांतराने बाजीरावांवर विठूरला उरलेले आयुष्य शांततेने व्यतीत करीत असताना पुन्हां सॆन्यानिशी गडबडीच्या भीतीपोटी सॆन्य ठेवण्यावर बंदी आणली. पण पुढे बाजीरावांना तीन कन्यारत्ने झाली १] कुरूंदवाड्करांकडे २] अस्मदपनाह बयाबाई नारो विष्णू आपटे ३] विठूरवासी थत्ते यांच्याकडे लग्ने झाली. बाजीरावांनी ऒरस मुलीनंतर दोन मुले द्त्तक घेतली १]राव साहेब व २] नाना साहेब ज्यांनी १८५७ स्वातंत्र्य  संग्रामाच्या उठावात भाग घेतला.
वर दाखविण्यात आलेल्या मधल्या मुलीचे आजे सासरे नारो विष्णू आपटे हे १७७९ला वडिलां बरोबर मिरजेत येऊन १७९४/९५ साली सरदार सांगलीकर यांच्याकडे कामावर राहून दिवसा नोकरी व रात्री वेषांतर करून निवडक सहकार्र्यां बरोबर बेळ्गांवचा किल्ला सर केला. ही वार्ता श्रीमंत बाजीरावांना समजतांच त्यांनी त्यांचे पदरी सरदारी देऊ केली. अश्या पद्धतीने नारो विष्णूंनी स्वत:ची पात्रता नरका नारायण होऊन सिद्ध केली. बाजीरावांनी ग्वाल्हेरला राणोजीं शिंदेच्या दरबारी ठेवण्याचा आग्रह त्यांच्यावर सॆन्यबंदी आल्यावर केला. नारो विष्णु आपटे यांचे राणोजी नंतर दॊलतराव शिंदे यांनी डंका, निशाण सामोरे पाठवून दरबारी १८१८ला ग्वाल्हेरला आणून स्वागत केले. आल्यावर त्यांना पेशवाईतील हुद्यासह बावन पागेवरचे अधिकारी नेमले. पुढे अदमासे ९ वर्षात दॊलतरावांना १८२७ ला देवाज्ञा झाली आणि बायजाबाई व जनकोजी यांत राज्यावरून वारसा हक्कातून तंटा सुरू होऊन बायजाबाईने नारो विष्णू यांना नरवरच्या किल्ल्यात कॆद केले. ईंग्रजांच्या मध्यस्थीमुळे त्यांची सुट्का होतांच थोडा काळ ईंदोरला घालवुन पुढे ब्रम्हावर्ती बाजीरावांकडे परत राहीले. पुन्हा जनकोजी सत्तेवर आल्यावर त्यांनी १८३३ साली श्री. रामजी केळकर यांना निवडक सॆन्यासह, डंका निशाण देऊन नारो विष्णूंना ब्रम्हावर्ताहून ससन्मान बोलावून घेतले आणि पूर्वीच्याच हुद्यावर कायम करून ग्वाल्हेरला चिट्णीस गोठात मोठा सात चॊकी वाडा, एक बाग देऊन स्वागत केले. १० वर्षात राज्यात भर घातली म्हणून जनकोजींनी १८४४ ला रावराजे समशेर जंग बहाद्दर हा किताब देऊन लिंपणगाव व देडगाव ही दोन गावची जहागिर व वंशपरंपरेची सनद दिली आणि पुढे १८४४लाच जनकोजींना देवाज्ञा झाली. कर्तुत्वाने १ वर्षात राज्यात भर घातलीच शिवाय माळ्व्याच्या सुभेदारी पासून सरसेनापदी पर्यंत पदोन्नती मिळविली. शिवाय तीस ह्झारी जहागिरदारी पण मिळविली. पुढे सन १८४५ ला नारो विष्णूंना ईंदोर येथे देवाज्ञा झाली.

               -------<<<ंंं>>>------
                                   


सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

सरदार हरि नारायण ऊर्फ बाबासाहेब आपटे

                                            सरदार हरि नारायण ऊर्फ बाबासाहेब आपटे

                                 hari naro apte
--- सरदार हरी नारायण उर्फ बाबा साहेब आपटे---
नारो विष्णू प्रमाणे ज्येष्ट चिरंजीव हरीपंत हुशार पण शॊकिन मिजाज होते. की पानाच्या विड्यात कस्तुरी घोड्यावर बसण्यापूर्वी एक बाटली अत्तर ओतल्यानंतरच स्वारी करत. शिवाय अश्वविद्येत निपुण होतेच घोड्यांची पारख करण्यात त्या काळांत दुसरा कोणीही नव्हता म्हणून महाराज दॊलतराव शिंदे यांनी दरमहा रू. २०००व डंका, निशाण देऊन सन १८२१ला नोकरीवर दाखल केले. पुढे नारो विष्णू नंतर १८४६ मधे वडिलोपार्जित सरदारीवर कंठी,शिरपेच वगॆरे देऊन दाखल केले.महाराज जयाजीराव शिंदे यांनी१८६६ मधे मॊजे लासूर,गुठीना ची सनद करून दिली.हरीपंतानी अश्वविद्येवर-अश्वहोलिका-ग्रंथ लिहिला,परंतू दुर्दॆवाने ग्रंथाची एकही प्रत आज कोठेही उपलब्ध नांही.त्यांच्या अश्वकॊशल्या संबंधी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाट्ते की ईंग्र्जांचे प्रतिनिधी ज्याला आपल्या अश्वकॊशल्यासंबंधी गर्व होता त्याने भरल्या दरबारात राजाला अजिंक्यपद देण्या बद्दल आग्रह धरला अन्यथा कोणीपण दरबारीने आव्हान स्वीकारावे, हरीपंतांनी ते स्वीकारून ऊलट त्यांनाच एका मोठठ्या विहीरीवर समोरच्या क्ड्यापर्यंत दोन ईंच जाड,दीड वीत रूंद लाकडी फ्ळी टाकून व्यवस्था झाल्यावर घोड्यावरून त्या पार जाण्यासाठी सांगितले त्यावर प्रतिनिधीने हरीपंताना आधी जाण्याचा आग्रह केला त्यांनी त्यापार जाऊन प्रतिनिधीने ह्ळूहळू अर्धे पार करताच हरीपंत पुढे सरसावले दोन्ही घोड्यांची तोंडे समोर झाली तेव्हा प्रतिनिधींनी घोडा परत नेण्यासाठी सांगितले अन्यथा हार कबूल करावी शेवटी हार कबूल झाल्यावर हरीपंतानी आपल्या घोड्यास मागिल दोन पायावर ऊभा करून घोडा परत फिरवून प्रतिनिधीला पाठोपाठ येण्यास सांगितले त्यांच्या पांढर्‍या पोषाखा वर तोंडातील पानाची पीक ऊडवली, त्यावर प्रतिनिधी रागाने लाल झाला ओरड्ला,"बत्तमीज" पुढे त्याला पीकातील कस्तुरीचा सुगंध वास येतांच तो राजांना बोलला कि,"पुरे हिंन्दुस्थान में ऎसा शॊकिन नहीं देखा." त्यावर राजानी आपल्या गळ्यातील कंठा काढून हरीपंतांच्या गळ्यात घातला. अश्या बर्‍याच गोष्टी ग्वाल्हेरच्या कवायद जहागिरदारान खात्यातील फाईलीतून वाचता येतील.पुढे १८८३मध्ये हरीपंताना देवाज्ञा झाली.