बुधवार, २६ जानेवारी, २०११

संस्थान

----          संस्थान आपटे(ग्वाल्हेर)घराण्याचा वंशवृक्ष
                                   नारो विष्णू
                             जन्म १६६०--    म्रुत्यू १७४५        
                 _________________।_________________
                                                                                   
           हरी ऊर्फ बाबा साहेब             विठ्ठल ऊर्फ भाऊ साहेब
                                                                     
           गणेश ऊर्फ राव साहेब          गोपाळराव ऊर्फ भॆय्यासाहेब
                (निपुत्रिक मरण)                       (निपुत्रिक मरण)
                                                                                                                           
          हरी ऊर्फ नाना साहेब              श्रीधर उर्फ दाजीसाहेब 
(९वर्षे वयात दत्तविधान)       (२पुत्र-पत्नीसह दत्तविधान)
                  ।                        ____________।__________
 दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब                                ।                              
जन्म-१९१५,  मरण-१९५८  माधव   परशुराम   निळकंठ   दामोदर*
                                        (महादेव)         * (दत्तविधानानंतर जन्म)

हा वंशवृक्ष सरदारी, जहागिरदारी संपेपर्यंतच दाखविला आहे, कारण ज्या ऊद्देशाने हे सगळे लिखाण चालू आहे ते फक्त जगातील आपटे कुटुंब यांना,शिंदे(सिंधिया) ग्वाल्हेरचे राजे यांनी पेशव्यांच्या वंशजांवर अन्यायांची घडी कशी वंश परंपरागत,पिढ्यानपिढ्या चालू ठेवून पुढ्च्या पिढीस दारोदारी हिंड्ण्याची वेळ आणली व पुढे नेस्तनाबूद केले.

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

प्रस्तावना


                                                         प्रस्तावना
आम्ही भावंडे(दुसरे) बाजीराव पेशव्यांकडील मुलीच्या(कॆ.बयाबाई) च्या घ्रराण्यातील प्रमुख नारो विष्णू आपटे ज्यांना पेशव्यांच्या सांगण्या वरून तत्कालीन राजे दौलत राव  शिंदे(सिंधिया)यांजकडे सन १८१८ संवत १८७५ मधे ग्वाल्हेरला धाड्ण्यात आले. नंतरच्या काळांत राजांच्या मनांतून, आमच्या चुलत घराण्या कडून आमच्या विषयी चुकीच्या आणि कुसंगत गोष्टी सांगून नाराजगी उत्पन्न करून आपली पोळी भाजून घेण्यात यश संपादन करून तीन पिढ्या चालत असलेली सरदारकी,झागिरदारी,शिलेदारी सगळे आपल्याकडे वळवून ह्ळूह्ळू आमच्या पिढीला दारोदारी फिरण्यास बाध्य केले. आमच्याकडे परमेश्वरी अवकृपा अशी की तीन  पिढ्यां  पासून नाबालगी  (लहान मूल असतांना वडीलां चे मरण)ओढ्वल्याने ५० वर्षांचा काळ खालिल खासगी मालमत्तेची बिल्हेवाट लावण्यास चुलत्यास मोकळे रान सापड्ले.खाली नमूद केलेली कोट्यावधीच्या मालमत्ते साठी कोर्ट कचेरी करण्यासाठी लागणारा लक्शाधीश खर्च आणि वेळ दोन्ही अशक्य असल्याने चुलत्यांस आयतेच सापड्ले व आम्हास ह्यासगळ्यावर  उदक (पाणी) सोडावे लागले.
.
मौजा लासूर जिल्हा मंद्सोर म.प्र.  
}

जहागिरदारीतील गावे
.
मौजा खातीखेडा जिल्हा मंद्सोर म.प्र.
}
.
मौजा गुठीना देवस्थान झागीर 
}

              
.
शिव मंदिर मागे वाड्यासह- क्षिप्रा नदी काठी,उज्जेन म.प्र.
}
}
अस्मद्पनाह
कॆ.बयाबाई सा.पुत्री
बाजीराव पेशवा(द्वितीय) ने स्वखर्चाने बांधले.                                      
.
शिव मंदिर मागे वाड्यासह- गउघाट, वाराणसी,उ.प्र.  
}
}
.
शिव मंदिर मागे वाड्यासह-काठ्मांडू, नेपाळ       
}
}

.
आराजी बाग कंपू, लश्कर ४.७५बीघा
}
}




खासगी मालमत्ता जी एकट्या माधवश्रीधर ने विकून पॆसावसूल केला.
.
आराजी बाग,बावन पायगाह,लश्कर-५बीघे
}
}
.
आराजी बाग,नई सडक,लश्कर-७बीघे
}
}
.
आराजी बाग,कटिखांदी,लश्कर-७.२५बीघे
}
}
.
७चोक, आजूबाजूला बांधकाम मिळून १२५/१२५ फूट मोठा वाडा, चिट्णीस गोठ
}
}
.
१२५/११०(गुणे ४) -फ़ूट चारी भावंडांची वेगवेगळी मिळून एक मोठा वाडा,जयेंद्र्गंज
}
}
वर सांगितल्या प्रमाणे तिसरी पीढी कॆ.द्त्तात्रय हरी ऊर्फ बाळासाहेब ज्यांचे शिक्षण राजे जिवाजीराव शिंदे बरोबर एक सहपाठी म्हणून राजांच्या मातोश्री अम्मा महाराज यांच्या हुकुमावरून सन १९२४ पासून सन १९३६ पर्यंत सहपाठी म्हणून राहणे शक्य झाले. बाळा साहेबांच्या, अकाली निधन ता.२५-७-१९५८ ला झाल्याने पुन्हां मुले
नाबालिग झाली. पत्नी कॆ.लीलावतीने पश्चात सन १९५९ ला दहावी बोर्ड परिक्षा पास करून नोकरी करून पुढे चारी अपत्यांना सुशिक्षित करून मार्गी लावण्याचे सत्कर्म पूर्णपणे पार पाड्ले.परंतु एवढ्यामोठ्या जबाबदारी मुळे तीला खासगी मालमत्तेकडे दुर्लक्ष करणे भाग पडले. पुढ्चे वर्णन सगळे कवायद जहागिरदारान ग्वाल्हेर मधील २५ फाईलीतून ईच्छुक व्यक्तींनी वाचून समाधान करावे.
आम्हां भावंडांना पुढे, कोर्ट कचेरी करूनही आम्हास कोर्टात न्याय मिळेल,     ह्या आशेने केस आमच्या बाजूने लागलेला असतांना चुलते माधव श्रीधर यांनी आमची शेवट्ची आठ्वण चिटणीस गोठातला राहता वाडा १४ वेगवेगळ्या लोकांना वेगळे भाग सन १९७४ मध्ये  कॊडीमोल भावात विकला च आमचा हिस्सा दिला नांही. आम्हाला आमची बाजू मांड्ण्या साठी कोणचाही पर्याय उरला नांही,पण मनांतून आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोड्ण्यासाठी हा मार्ग अवलंबवावा लागला, जेणे करून इच्छुक व्यक्तिंना विश्वभरात आमच्या वरील अन्याय वाचता यावा.
आमच्या घराण्या संबंधी कॆ.बयाबाई साहेबांच्या वेळेपासून शिंदे घराण्याने असा कांही व्यवहार केला ज्याला पोटात कांही आणि ओठांत कांही असे म्हणू शकतो. ऊदाहरण द्यावयाचे झाले तर गणेश हरी निपुत्रिक वारल्यानंतर कॆ. बयाबाईंनी ९ वर्ष वयाच्या हरी ऊर्फ नानाला द्त्तक घेतले राजाच्या मरणानंतर  कॊंसिल ऒफ रीजन्सी ला बाई साहेबांनी अर्ज केला व द्त्तविधानाला मंजूरी घेतली  पण नाबालिग राजाने गादीवर आल्यावर न्याय फिरविला माण्साने ऊजरदारी केली, त्यांना न्याय मिळाला नांही त्याऊलट गणेशची सरदारी दुसर्‍या पिढीतील गोपाळ विठ्ठ्ल यांना दिली. पण त्याच्या उलट, जेव्हां गोपाळराव निपुत्रिक वारले तेव्हां ऊजरदारी केल्यानंतरही (त्रिंबक) श्रीधर ह्या दोन मुले,पत्नीसह एवढ्या मोठयाला दत्तविधानांस राजाने नुसती मंजुरीच नाही वर जहागिरदारी देऊन राजाने, मिळ्वलेला न्याय फिरवला.दुस्रर्‍यांदा पुन्हां श्रीधरच्या मरणानंतर माधव श्रीधरच्याही वेळेस माझे वडील दत्तात्रय हरीने ऊजरदारी केली स्पष्ट लिहिले की माधव श्रीधरचा जन्म दुसर्‍या घराण्यांत दत्तविधानापुर्वी झाल्याने त्यांचा ह्या घराण्याशी किंव्हा जहागिरदारीशी संबंध नांही,  तरी राजाने ऊजरदारी नामंजूर करून द्त्तात्रय ऊर्फ बाळासाहेबांच्या क्ब्जात असलेला वाडा, बाग(अनुक्रमे नं.५व१) माधवरावांना जहागिरदारी १९३६ला दिली.अशा पध्दतीने प्रत्येक वेळा राजाने कूर्मगतीने पेशवे वंशजांना देशोधडीला लावले.
                     -------< < > >--------