सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

सरदार हरि नारायण ऊर्फ बाबासाहेब आपटे

                                            सरदार हरि नारायण ऊर्फ बाबासाहेब आपटे

                                 hari naro apte
--- सरदार हरी नारायण उर्फ बाबा साहेब आपटे---
नारो विष्णू प्रमाणे ज्येष्ट चिरंजीव हरीपंत हुशार पण शॊकिन मिजाज होते. की पानाच्या विड्यात कस्तुरी घोड्यावर बसण्यापूर्वी एक बाटली अत्तर ओतल्यानंतरच स्वारी करत. शिवाय अश्वविद्येत निपुण होतेच घोड्यांची पारख करण्यात त्या काळांत दुसरा कोणीही नव्हता म्हणून महाराज दॊलतराव शिंदे यांनी दरमहा रू. २०००व डंका, निशाण देऊन सन १८२१ला नोकरीवर दाखल केले. पुढे नारो विष्णू नंतर १८४६ मधे वडिलोपार्जित सरदारीवर कंठी,शिरपेच वगॆरे देऊन दाखल केले.महाराज जयाजीराव शिंदे यांनी१८६६ मधे मॊजे लासूर,गुठीना ची सनद करून दिली.हरीपंतानी अश्वविद्येवर-अश्वहोलिका-ग्रंथ लिहिला,परंतू दुर्दॆवाने ग्रंथाची एकही प्रत आज कोठेही उपलब्ध नांही.त्यांच्या अश्वकॊशल्या संबंधी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाट्ते की ईंग्र्जांचे प्रतिनिधी ज्याला आपल्या अश्वकॊशल्यासंबंधी गर्व होता त्याने भरल्या दरबारात राजाला अजिंक्यपद देण्या बद्दल आग्रह धरला अन्यथा कोणीपण दरबारीने आव्हान स्वीकारावे, हरीपंतांनी ते स्वीकारून ऊलट त्यांनाच एका मोठठ्या विहीरीवर समोरच्या क्ड्यापर्यंत दोन ईंच जाड,दीड वीत रूंद लाकडी फ्ळी टाकून व्यवस्था झाल्यावर घोड्यावरून त्या पार जाण्यासाठी सांगितले त्यावर प्रतिनिधीने हरीपंताना आधी जाण्याचा आग्रह केला त्यांनी त्यापार जाऊन प्रतिनिधीने ह्ळूहळू अर्धे पार करताच हरीपंत पुढे सरसावले दोन्ही घोड्यांची तोंडे समोर झाली तेव्हा प्रतिनिधींनी घोडा परत नेण्यासाठी सांगितले अन्यथा हार कबूल करावी शेवटी हार कबूल झाल्यावर हरीपंतानी आपल्या घोड्यास मागिल दोन पायावर ऊभा करून घोडा परत फिरवून प्रतिनिधीला पाठोपाठ येण्यास सांगितले त्यांच्या पांढर्‍या पोषाखा वर तोंडातील पानाची पीक ऊडवली, त्यावर प्रतिनिधी रागाने लाल झाला ओरड्ला,"बत्तमीज" पुढे त्याला पीकातील कस्तुरीचा सुगंध वास येतांच तो राजांना बोलला कि,"पुरे हिंन्दुस्थान में ऎसा शॊकिन नहीं देखा." त्यावर राजानी आपल्या गळ्यातील कंठा काढून हरीपंतांच्या गळ्यात घातला. अश्या बर्‍याच गोष्टी ग्वाल्हेरच्या कवायद जहागिरदारान खात्यातील फाईलीतून वाचता येतील.पुढे १८८३मध्ये हरीपंताना देवाज्ञा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा