सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

सरदार गणेश हरि ऊर्फ रावसाहेब आपटे

                                            सरदार गणेश हरि ऊर्फ रावसाहेब आपटे
                                   (पत्नी -  बयाबाईसाहेब, पुत्री बाजीराव पेशवा द्वितीय)
सरदार गणेश हरी ऊर्फ राव साहेब आपटे सरदार गणेश हरी हे वडील आजोबा सारखे अश्वविद्येत तर पारंगत होतेच शिवाय गजविद्येतही पारंगत होते. जसे राव साहेब मोठे लग्नवयात आले तसे जयाजीरावांच्या आई बायजाबाईंचे लक्ष, विठुरवासी बाजीराव (द्वितीय) यांची मधली मुलगी, सरस्वतीबाई ऊर्फ बयाबाई साहेबांवर गेले त्यांनी मध्यस्थी होऊन राव साहेबांशी लग्न १९४९ मध्ये विठुरला घडवून आणले संपूर्ण एक महिना लग्न-
सोहळा
विठुरवासियांना निमंत्रण चुलीला अक्षद होती."सारंगा" हा अस्सल अरबी घोडा त्यांचा आवडता होता. एकदा ग्वाल्हेर येथे मिरवणूक निघाली असता वाटेत अकरा हात ऊंचीची एक मा लागली अनेक स्वारांनी त्या कमानी ला हात लावण्याचा प्रयत्न केला. जयाजीराव महाराज अंबारीत होते आणि हत्तीच्या साथीला घोड्यावर एका बाजूला हरीपंत दुसर्‍या बाजूला गणेशपंत होते.ईतरांचे कमानीला हात लावण्याचे फसलेले प्रयत्न गणेशपंतांची घोड्यावरची चुळ्बुळ बघून महाराजांनी गणेशपंतांना घोडा फेकण्या करीता आज्ञा केली.त्याबरोबर गणेशपंतांनी सारंगाला टाच मारून कमानी वर मधोमध घोडा झेपावला हात लावला. ते बघून जमलेल्या शेकडो लोकांच्या तोंडून कॊतुकाचे शब्द बाहेर पडले.         गणेशपंत अतिशय तापट होते.एकदा कांही क्षुल्लक बाबीतून एका यूरोपियनशी भांड्ण झाले,त्या अधिकार्‍याच्या तोंडावर थुंक्ल्याने तक्रारी वरून जयाजीराव महाराजांनी गणेशपंताना आग्रा राहण्यास धाडले पुढे कांही दिवसांनी तेथे स्पर्धा झाल्या.स्पर्धांबद्दल राजांनी केल्यावर गणेशपंत बोलले""महाराज लोक घोड्यावर बसून घोड्याच्या ईज्जतीशी खेळ करताहेत त्यामुळे घोडे म्हॆस बॆला सारखे ऊड्या मारतात आहेत.""महाराजांची आज्ञा झाल्यावर,गणेशपंतानी स्वारांना घोड्यांनी ऊडी घेण्यासाठी बनविलेल्या चॊथर्‍यावर एका स्वारांस भाला देऊन ऊभे केले त्यावरून ऊडी मारणे यूरोपियनने अशक्य असण्याचे म्हणतांच त्यावरून गणेर्शपंतानी सारंगावर स्वारी करून भाल्यावरून झेप घेऊन पलीकडे गेले पुन्हा पलटून झेप घेऊन आपल्या जागी परत आले.अश्या पद्धतीने यूरोपियन अधिकार्‍याच्या सांगण्य़ावरून महाराजांनी गणेशपंतांना ग्वाल्हेरला परत बोलावले.पुढे १९८३ मधे बाबा साहेबांच्या पाठोपाठ १९८४ मधे निपुत्रिक असताना राव साहेबांना पण देवाज्ञा झाली
                     ----<<

ंंं>>>----.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा